इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हे नवे सामर्थ्य तुम्हाला कोणत्याही प्रसंगात विजयी करील
श्रद्धा हाच तुमचा आधार, सदैव आधार. जीवनातील कर्तव्य-पालनाची दर क्षणाची जबाबदारी ही सर्वात मोठी जबाबदारी माना. कर्तव्य करीत असतांना दृढ राहिलात तर त्यायोगे श्रद्धा वाढेल आणि श्रद्धेबरोबरच सर्वप्रकारचे बळही वाढेल. हे नवे सामर्थ्य तुम्हाला कोणत्याही प्रसंगात विजयी करील.
दिव्य प्रेम हीच अखिल विश्वाला व प्राणिमात्राला निर्माण करणारी महान शक्ती आहे. याच प्रेमाचे वलय वस्तूमात्राभोवती वेढून राहिलेले आहे. प्राणिमात्राच्या भाग्याची सूत्रे ज्या शक्तिमंताच्या हाती आहेत, दिवस-रात्र, क्षणोक्षणी आमच्याकडे ज्या शक्तीची दृष्टी खिळलेली आहे. ती शक्ति म्हणजे सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् दिव्य प्रेमच आहे. आपल्या सर्वज्ञतेने कोणत्याही वाट चुकलेल्या जीवास ते योग्य मार्गावर आणते.