इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हे राखण्याचा प्रयत्न करा
आपल्यामध्ये नाना तऱ्हेच्या कमतरता आहेत व त्याची आपल्याला जाणीवही आहे हे खरे. पण तेवढ्याने भागणार नाही. या ज्ञानाचा योग्य तो उपयोग आपण केला पाहिजे. एक गोष्ट प्रथम केली पाहिजे, आपल्या दोष-प्रमादांचे समर्थन न करता अथवा त्यांचा रागराग किंवा निषेध न करता त्यांना परमेश्वराच्या दिव्य शक्तीसमोर शुद्धीकरणार्थ ठेवले पाहिजे.
परमेश्वराच्या इच्छेशी आपल्या इच्छेची तार जुळवून घेऊन निवांत शांत राहिले पाहिजे. कारण कोणत्याही अवस्थेत अशी, ‘निवांत शांती’ ही परमेश्वरी शक्तीच्या अवतरणाची, नितांत आवश्यक अशी अनुकूल अवस्था आहे. ती राखण्याचा प्रयत्न करा.