इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हे किती वेडेपणाचे!
आपल्या नशिबी अमुक आहे, तमुक नाही, हे ठरवून टाकण्याची किती घाई! असे करणे अगदी निरर्थक. कारण ‘नशीब’ म्हणतात ते बदलत्या स्वभावाचे असते. अशा अस्थिर वस्तूचे वास्तव ज्ञान होणे अशक्य आहे. तुम्ही सुद्धा क्षणोक्षणी बदलणारेच आहात. हे सर्व ध्यानी घेऊनच नशिबाचा विचार करणे आणि धूसर भविष्यांत डोकावून वर्तमानाकडे दुर्लक्ष करणे, हे सोडून दिलेले बरे.
मार्गदर्शनासाठी पावलोपावली आत डोकावून पाहण्याचा अभ्यास ठेवा. समोरील रस्ता ओळखीचा नसतांना, कोणाचे तरी बोट धरणे शहाणपणाचे नाही का? योगायोगाने हाती आलेल्या कामास कंटाळून दुसऱ्या कामाची आशा बाळगणे किती वेडेपणाचे आहे! कारण कोणत्या कामाकरिता देवाने आपली निवड केली आहे, हे आपणास कुठे माहित आहे? तेव्हा देव ठेवील तसेच राहणे, हेच चांगले.