इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हे करुन मोकळे व्हा
ऐहिक जगातील काळज्या, विवंचना, कष्ट, दुःख याच्या जंजाळात गुरफटून जाऊ नका. ऐहिक जगातील सुखे व विलोभने यांच्या पिंजऱ्यात अडकून पडू नका. ऐहिक सुख व दुःखे हृदयात भरून ते परमेश्वरास अर्पण करून मोकळे व्हा. नंतर विचार करून शोधून काढा की तुमच्या ठिकाणी असे काय काय आहे, जे ईश संकल्पास विरोधी व सत्यसंकल्पास बाधक आहे? त्यानंतर त्यावर सावधानतेने एकसारखे तडाखे देत देत त्याचा विळखा ढिला होईल असे करा. मग युक्तीने त्यातून आपली सुटका करून घ्या. या कामी परमेश्वराचे सतत मार्गदर्शन व मदत तुम्हास खास मिळेल.