इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे ऐकले व पाहिले पाहिजे
तुमच्या ध्येयशिखराकडे जाणाऱ्या मार्गावर तुमचे पाऊल पुढे पुढे पडत जावे यासाठीं प्रत्येक पावलावर तुम्हाला मार्गदर्शन होत असते. फक्त प्रत्येक पावलावर मार्गदर्शन मिळत असताना साध्या गोष्टीहि महत्त्वाच्या ठरत असतात. तुम्ही अंतरंगी डोकावून ऐकले पाहिजे व पाहिले पाहिजे की, आपली पावले बरोबर, योग्य मार्गावर पडत आहेत की नाही ? जागृत राहून इतके केले म्हणजे मग दुसरी कोणतीच जबाबदारी तुमच्यावर नाही. समजा, कुठे संशय उद्भवला अथवा अस्वस्थ वाटले, तर तत्क्षणी परमेश्वराचे स्मरण करून, तो मार्गदर्शन करीत असल्याची ती खूण समजून, स्वतःची इच्छा दूर ठेवून कामास प्रारंभ करा म्हणजे योग्य मार्ग तुम्हाला सापडेल.