विचार पुष्प
हे एक कठोर सत्य आहे
मनुष्य मात्र हा शांती शक्ती व समृद्धी यांनी बनलेली प्रतिमाच आहे. तो बुद्धीने व प्रेमाने परिपूर्ण आहे. तो विचारांचा स्वामी आहे. प्रत्येक कुट परिस्थितीचे उत्तर त्याच्याच हातात आहे. तोच स्वतःचा शत्रू आणि तोच स्वतःचा मित्र आहे. त्याच्याहून निराळे असे त्याच्या बाहेर जग नाहीत, हे एक कठोर सत्य आहे. अनुकूल फळ मिळावे अशा तऱ्हेने आपल्या विचारांना दिशा लावावयास तो मोकळा आहे. विचारांचा प्रत्यक्ष पडताळा पाहून आत्मविश्लेषण करणे, नानाविध क्षेत्रात नाना उलट-सुलट, बरे-वाईट अनुभव शांतचित्ताने घेणे, त्यावर खोल चिंतन करणे, आपल्या ठिकाणीच विचारांचे नियम बसविता येतात. जीवनाला गती आणि योग्य दिशा लागते. मनुष्याने अंतरंगीच संशोधन करून जीवनाचे मूल्य हस्तगत करून घ्यावे.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/