इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे आपणास आजपर्यंत समजले नाही
तसे पाहिले तर जगातील प्रत्येकाजवळच स्वतःस पुरून उरेल इतकी समृद्धी, शक्ती व वेळ असतो. त्याचा उपयोग नित्याच्या जीवनात कसा करावयाचा आहे, हे आपणास आजपर्यंत समजले नाही. तरी मदत करण्यासाठी सतत पाठीशी असलेला परमेश्वर तशा संधी आपोआप आणून उभ्या करत असतो.
जगामध्ये अशा सुसंधी पुष्कळ आहेत. त्यात नीटनेटकेपणा आणायचा आहे. किती तरी अंधारात चाचपडत आहेत, त्यांना प्रकाश द्यावयाचा आहे. कितीतरी दुर्बल आहेत, त्यांना मदत पाहिजे आहे, त्यांना मार्गावर आणावयाचे आहे. कित्येक उपाशीतापाशी आहेत, त्यांना संतुष्ट करावयाचें आहे. तेव्हा वर पाहू नका, खाली पहा. मागे नको, पुढे पहा. आत नको, कडेला पहा आणि मदतीसाठीं हवे तेथे धावून जा.