इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे आदरपूर्वक स्वीकारा
स्वतःमध्ये स्वतःचे असे काहीही न राखता ईशचरणी स्वतःचे दान करून टाका. नंतर साहजिकच सबंध दिवसात जे जे काही पुढे येईल, भेटेल ते ते सर्व भगवंताकडूनच आलेले आहे, या भावनेने आदरपूर्वक स्वीकारा. आपण केवळ वाहन आहोत, एक रिकामे पात्र आहोत. वस्तू येतात, जातात; येऊ द्याव्यात व जाऊ द्याव्यात. आपली वृत्ती ही अशी पाहिजे, हे मनावर सारखे बिबवीत रहा. इतके जरी आपण दक्षतेने करू शकलो, तरी आपण प्रगतीच्या मार्गावर निश्चित एकेक पाऊल पुढे पुढे गेल्याशिवाय रहाणार नाहीं.