विचार पुष्प
हे आपण ओळखले का…
तुमच्या भोवतालच्या माणसांचे खाणे-पिणे, वागणें, रीतीरिवाज यावरून स्वतःबद्दल आडाखे बांधू नका. त्यांच्याप्रमाणे वागून स्वतःची ओढाताण होत असेल, तर त्यांना त्यांच्या गतीने व मार्गाने जाऊ द्या. त्यांचा विचार दूर ठेवून, स्वतःचा मार्ग स्वतःच्या गतीने आक्रमू लागा. तुम्ही मंद, आळशी व अव्यवहारी आहात असे कोणी म्हटले तर म्हणू द्या. तुम्हाला पैसा कमी मिळेल; त्याच्याइतके कर्तबगार तुम्ही दिसणार नाही; असे झाले तरी हरकत नाही. पण तुमच्या प्रकृति-स्वभावानुसारच स्वतःचा विकास साधा. एखाद्या यंत्राप्रमाणेच आपल्या सर्वांचे असते. आपल्या सर्वांच्याच शक्तीला, बुद्धीला व कर्तबगारीला मर्यादा असतात. त्या आपण ओळखल्या पाहिजेत. यंत्राप्रमाणे विशिष्टच काम, विशिष्ट गती व दिशा राखणे या गोष्टी आपणासही लागू आहेत. हे लक्षात ठेवून संतोषाने जीवन जगणे अवश्य आहे.