इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हातून काही अनुचित घडले, तर…
समजा हातून काही अनुचित घडले, तर त्याबद्दल मनाला उगीच हुरहुर लावून न घेता, पुन्हा नवीन उत्साहाने, सद्गुणाच्या मार्गाने प्रवास करणारा हाच खरोखर साधक. दिवसातून शंभर वेळा पडण्याचा प्रसंग आला, म्हणून काय झाले? दर वेळी परमेश्वरास हाक मारून मदतीसाठीं प्रार्थना करणे हाच त्यावर उपाय नाही का?
समंजस, विवेकी आणि सद्गुणी माणसाला पापाची भीति वाटते हे जसे खरे, तसेच अथवा त्याहूनही अधिक खरे हे आहे की, जे जे काही चांगले, मंगल आहे त्याविषयीचे त्याला आकर्षण व प्रेम अधिक असते. वाईट काय आहे ते चुकविण्याकडे तो सर्व शक्ति गुंतवत नाहीं. त्याचा आटोकाट प्रयत्न असतो, जे जे शुभ व मंगल आहे ते आचरण्याचा.