इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हा नित्य अनुभव येईल
आपण एखाद्या भावनेच्या आहारी जातो, आत्मसंयम सुटतो. पण सर्व वेळी व सर्व बाबतीत, येईल त्याला धिटाईने तोंड देण्याचे व्रत आपण घेतले, तर आपल्याला शांतीचा व ईशसान्निध्याचा नित्य अनुभव येईल.
जे काही आपल्यापाशी, आपल्याभोवती आहे ते दूर लोटण्यासाठी धडपडणे आणि जे काही दूर आहे, आपल्या हातचे नाही ते हव्यासाने ओढण्याचा यत्न करणे म्हणजेच अस्वस्थता, अशांतीस अधीरता. पण या सर्व गोष्टींविषयी अलिप्त राहून, त्यातील अनिष्टता कशी आपोआप विरून जाते हे तुम्ही स्वानुभवाने पाहण्याचा यत्न कां नाही करीत?
तुम्ही विरोध करता, तिरस्कार करता व त्यायोगेच त्यांना अनिष्ट बनविता. शांती ही आत असते, बाह्य वस्तूत ती नसते. सर्वस्वीकार-व्रतानेच ती लाभते.