इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हा निश्चय करा
सुप्रभाती उठा आणि मन शांत ठेवून निश्चय करा की, दिवसभर कोणत्याही परिस्थितीत मी माझे मन असेच शांत ठेवीन. नंतर संबंध दिवसभर स्वतःवर लक्ष ठेवा. पहा. मनात जरा कुठे चलबिचल दिसली, तर लगेच सकाळी तुम्ही केलेल्या निश्चयाचे स्मरण करा आणि मनास पुनः ताळ्यावर आणा. असे म्हणा की : “ठीक आहे, आता थोडीशी चूक झाली, पुढे अधिक काळजी घेऊन पावले टाकू म्हणजे झाले.” वरचेवर असे म्हणण्याचे प्रसंग किती जरी आले, तरी कंटाळू नका. दर वेळी निश्चयाचे स्मरण व पुनर्निश्चय करीत रहा. निराश होऊ नका. जे काही प्राप्तव्य आहे त्याचे सतत स्मरण ठेवा. दुसरा मार्ग नाही.