इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…हा जवळचा मार्ग आहे
आळस आणि निष्क्रियता यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो. अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते. या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात…
स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे… योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.