इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हा अत्यंत दुर्मिळ गुण
प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो तेव्हा त्या व्यक्तीसमोर नतमस्तक झालेच पाहिजे. खऱ्या प्रामाणिकपणामध्ये परिपूर्ण सचोटी आणि पारदर्शकता असते. त्या व्यक्तीमध्ये ढोंगीपणाचा लवलेशही नसतो, ती व्यक्ती कोणतीही लपवाछपवी करत नाही किंवा स्वतः कोणीही नसताना, मी कोणीतरी आहे असे ती व्यक्ती दाखवीत नाही. मानसिक प्रामाणिकपणाचा उदय : या उदयामुळे मनाला हे उमगेल की, मन हे केवळ एक माध्यम आहे, ते स्वयमेव गंतव्य नव्हे.