इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हा आनंदाचा अक्षय्य झरा आहे
अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या कामांतही निर्दोषता आणि सर्वांगपूर्णता येत राहणे हा आनंदाचा अक्षय्य झरा आहे. साध्यासुध्या पण उच्च दर्जाच्या सद्भावनांचा आदर राखण्यासाठी कर्तव्यकर्म करतांना कठोर व दृढ राहण्याच्या अभ्यासामुळे माणसाचे मनोधर्य इतके वाढते की, सद्भावनांच्या रक्षणार्थ जगाचा राग तो सोसेल आणि मरणाचीही भीती न बाळगता आपले कर्तव्यकर्म पार पाडील.
आपल्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना कुरवाळण्याची आपल्याला फारच संवय असते. आपल्या कल्पनेतल्या मोठ्या कार्यात आपल्याला रमायला आवडते. पण अगदी साध्या गोष्टीच महान्, उच्च पातळीवर करणे यातच खरे मर्म आहे. सामान्य कर्मातच आंतरिक प्रगती कळते.