इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
शांती आणि आनंद मिळण्यासाठी
‘ईश्वरा’ला जे अपेक्षित असेल तेच आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे हवेसे वाटणे, ही जीवनातील शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक अट आहे. माणसांची जवळजवळ नेहमीच अशी खात्री असते की, त्यांना काय हवे आहे आणि जीवनाने त्यांना काय प्रदान करायला हवे, हे त्यांना ‘ईश्वरा’पेक्षादेखील अधिक चांगले समजते. आणि खरे तर यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात. इतरांनीसुद्धा आपल्या अपेक्षांची पूर्तता करावी आणि परिस्थितीने देखील आपल्या इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सगळ्या माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि ते दुःखी होतात.