इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
फुले आणि माणूस
फुलं अगदी शांतपणे आणि दयाळूपणे गहिरं प्रेम आणि शांतिपूर्ण मधुरता पसरवीत असतात. त्याची इतर कशाबरोबर तुलनाच होऊ शकत नाही. दुःख आणि वेदनांनी क्षतिग्रस्त झालेल्या या विश्वामध्ये, ‘प्रकृती’च्या याच प्रक्रियेमुळे संतुलन निर्माण होत असते….
प्रकृतीची ही देत राहण्याची प्रक्रिया ही माणसाच्या घेत राहण्याच्या प्रक्रियेस निष्प्रभ करते आणि संतुलन घडवते. अस्तित्वाला एक अर्थवत्ता प्रदान करते. यातील प्रकृती ही फक्त देते, देतच राहते आणि माणूस — तो फक्त घेतो, घेतच राहतो आणि इतरांसाठी काहीच शिल्लक ठेवत नाही.
माणूस हा या फुलांच्या तुलनेत इतका अहं-केंद्रित आणि क्षुद्र असतो. आणि सर्वांत वाईट गोष्ट अशी की, माणसाला इतरांकडून जे प्राप्त होते त्याने तो कधीही समाधानी होत नाही. कृतज्ञतेच्या भावनेचा त्याच्यामध्ये अभाव असतो. त्याला असे वाटते की, तो उत्क्रांतीच्या शिडीवरील सर्वांत वरिष्ठ स्थानी आहे, त्याला काहीही करण्याचा अधिकारच आहे जणू. हे खूपच विचित्र आहे. केवळ ‘प्रकृती’ सहजस्वाभाविकपणे स्वतःला प्रदान करत असते आणि विरोधी प्रक्रिया रद्दबादल करत असते आणि म्हणूनच ही पृथ्वी अजूनही रहिवासासाठी योग्य अशी आहे.