इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
एकच इच्छा बाळगून रहा
स्वतःच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला आकार देण्यासाठी देवाने तुम्हाला स्वतःच्या हाताने बळकटपणे पकडले आहे. हा आकार आपणास यावा यासाठी तुम्ही स्वतःची इच्छा बाजूस सारून, जो काही आकार येत आहे त्यास संमती देत राहिले पाहिजे.
एकच इच्छा बाळगून रहा : परमेश्वराच्या इच्छेचे अनुसरण करण्याचीच फक्त इच्छा धारण करा. जे जे येईल त्याविषयी ‘होय, तसेच’, ‘ठीक आहे’ असे नेहमी म्हणता येणार नाहीं काय ? लहानसहान सर्वच गोष्टीत ही दृष्टी तुम्ही स्वीकारली, तर सर्वांत जवळच्या मार्गाने सर्वांत उच्च पदास तुम्ही जाऊन पोहोचाल.