इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
एक संधी तरी यामुळे चालून येते
एखाद्या कार्याबद्दल अथवा घटनेबद्दल आपण मनात योजना करतो, मांडणी करतो व काही अपेक्षेने त्या कामास लागतो. मनाप्रमाणे सर्व घडावे अशी अपेक्षा बाळगून आपण वागतो. पुष्कळ वेळा बेत विफल होतात, पूर्वयोजनेत बदल करावे लागतात व मनातील अपेक्षा भंगतात. असे का व्हावे? कशाने का होईना, पण त्यामुळे एक गोष्ट घडते. स्वतःच्या कामाबद्दलचा स्वार्थ, ममता व स्व-सामर्थ्याविषयीची घमेंड विरते. आणि महत्तम शक्तीपुढे नम्र होऊन तिला शरण जाण्याची एक संधी तरी यामुळे चालून येते. अशावेळी खरोखरीच कामाविषयी व योजनेविषयी पूर्ण निर्मम होऊन ते काम देवाचे म्हणून करायला सुरुवात करा. कारण तेच शिकविण्यासाठी तर देवाने आपल्या मनाविरुद्ध अशा गोष्टी घडवून आणलेल्या नसतात कशावरून?