विचार पुष्प – धीमेपणा आणि भ्रम
कोणाशीही वागतांना धिमेपणा राखा. स्वतःचाही विचार करतांना, स्वतःस कामास लावतांना तर अधिक धिमेपणा धारण करा. स्वतःला स्वतःवरच जुलूम करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आपणच आपले मालक आहोत असा भ्रम बाळगू नका. स्वतःच्या ठिकाणी काही अपूर्णता दिसल्यानंतर एवढे अधीर होण्याचे काय कारण? पडलात ना? ठीक आहे. अंगाची माती झटका आणि चटकन् ताठ उभे रहा आणि पुढे चालू लागा. पुन्हा असे पडणार नाही याची जरा काळजी घ्या म्हणजे झाले. रोज काहीतरी नवीन काम, नवीन कृति करा. एखाद्या यंत्राप्रमाणे एखाद्या चाकोरीतून सतत फिरत राहणे ही तामसिकता आहे. निर्जीव बनणे आहे. दररोज, प्रत्येक क्षणीं नवीन बनण्याचा प्रयत्न करूनच अध्यात्म मार्गावर तुम्ही उत्तरोत्तर प्रगत व्हाल, अन्यथा नाही. झाले तेवढे पुरे, असे कधीही समजू नका. नवीन होत राहणे हेच खरे जीवन.
(संकलित)
Vichar Pushpa Dhimepana Aani Bhram