इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
बाह्य वेष व वागण्यावर हे नसते
उपासतापासाने शरीर सुकविणे, त्याची निगा न राखणे, अंगाला राख फासणे, अंगाभोवती गोणपाट गुंडाळून बसणे, उघडेवाघडे राहणे…ही संतसाधुत्वाची लक्षणे आहेत काय? तर मुळीच नाही.
एखादी सामान्य गृहिणी घ्या, नित्याचीच कर्तव्यकर्मे प्रसन्न मनाने, ईश शरणवृत्तीने, धिमेपणाने, निगर्वीपणाने, हंसतमुखाने, प्रेमळपणाने ती करीत असेल, तर शास्त्रे-पुराणे तिला आणखी काय सांगणार? ती तर आधीच साधुपदी, संतपदी पोहचली आहे असे म्हणावे लागेल. साधुत्व हे वृत्तीमध्यें असते. बाह्य वेषावर वा वागण्यावर नसते.