इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
असा व्यक्ती ठेचाळत नाही
एखाद्या सावध व सराईत प्रवाशाकडे पाहा. पायाखालची पाऊलभराची वाट तो नीट न्याहाळून पावले टाकीत पुढे पुढे चाललेला असतो. दूरवर दिसणारे सुंदर डोंगर आणि वेगाने वहाणारी नदी याकडे निरखत राहून तो ठेचाळत नाही. कारण, पायाखाली असलेली तसूभर जागा तो चालू क्षणाच्या वेळात ओलांडत चालला तर योग्य वेळी तो डोंगराच्या पायथ्याशी, नदीच्या पात्राशेजारी पोहोचणारच आहे याची त्याला खात्री असते. तसेच आपलेही असले पाहिजे.
वर्तमानातील आपल्या समोरचा क्षण मोलाचा समजून त्याचा अधिकात अधिक चांगला उपयोग करून घेण्याची कला अभ्यासाने साध्य करून घ्या. भविष्यातील काल्पनिक अडीअडचणी वा यशाचा गौरव यांनी चित्तास डगमगू देऊ नका. भविष्याचे ओझे हे काही देवाने तुमच्या डोक्यावर ठेवलेले नाही.