इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…अशा वेळी ही संधी द्या
प्रभो, या बदलत्या व विविधतेने गजबजलेल्या जगात वावरतांना, मला मार्गदर्शन कर. घडणाऱ्या बऱ्या-वाईट, सर्वच घटनांत माझे मन सतत प्रफुल्लित व शांत राहू दे. तुझ्या इच्छेच्या आधीन होण्यात मला आनंद वाटू लागू दे. कसोटीचे प्रसंग प्रगतीसाठीच असतात हे जाणून, अशा प्रसंगी मी कधीच कुरकुर करणार नाही इतके तरी माझ्या मनास बळ तू दे. खरोखरी संकटसमयीच आपण देवाच्या अधिक सन्निध असतो. कारण, त्याच मार्गाने तो आपणातील अशुद्धि काढून टाकतो आणि आपल्या अंतःकरणास अधिक तेजस्वी बनवीत असतो. मनःशांतीच्या प्रयत्नांत दुःखे, अडचणी यांना विशेष महत्त्व आहे. अशा वेळी श्रद्धा व धीर या सद्गुणांना आपला प्रभाव पाडण्यास संधी द्या.