इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
असेच सारखे होत जाईल
जगांतील सर्व काही लयाला जाईल. फक्त तुम्ही जे काही बरे वाईट बनले असाल ते तुमचे बरे वाईटपण शिल्लक उरेल आणि परमेश्वराची इच्छा फक्त उरेल. तुम्ही आज जी कर्मे करीत आहात ती बीजे आहेत. त्यांचे जे पीक येईल त्यातून तसलीच असंख्य बीजे निर्माण होतील. आणि त्यातूनही तसेच आणखीही पीक पिकेल. असेच सारखे होत जाईल. प्रत्येक दिवसातील प्रत्येक साधे-सुधे कर्म, ते चांगले वा वाईट प्रकारचे बीज आहे. प्रत्येक दिवस हा या दृष्टीने तुम्हाला तुमच्या देवाजवळ किंवा त्याच्यापासून दूर नेणारा ठरतो.