इंडिया दर्पण 
– विचार पुष्प – 
असे क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करा
कधी कधी अभावितपणे देवाचे स्मरण होईल व हृदय हेलावेल, ते कृतज्ञतेने व भक्तीने भरून येईल. अशा वेळी सर्व गोष्टी दूर ठेवून, मौन स्वीकारून शांत व्हा. जीवनात नावीन्य आणणारा प्रकाश व शब्द तुम्हास प्रदान करण्यात येईल, त्याचा स्वीकार करण्यासाठी तत्परतेतेने एकाग्र रहा. अन्यथा जीवनातील कर्माची गर्दी, वृत्तीची धावपळ, जगातील गोंधळ यामुळे तुम्ही या वरदानास मुकण्याचा संभव असतो. असेच क्षण मधून मधून अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचा अंतरात्मा जागृत असेल, तर तो तुम्हाला पावलोपावली प्रकाश व सल्ला देऊन तुमचे मार्गदर्शन करीत असतो.
 
			








