इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
आनंदात राहता यावे
स्वसंतोषाच्या आनन्दात सतत विहरता यावे असे प्रत्येकाला वाटते. तर मग वस्तुजातामध्ये सुप्त असलेली व उदित होऊ पहात असलेली भगवंताची इच्छा जाणण्यासाठी, तिचा स्वीकार करण्यासाठी स्मित वदन ठेवून, प्रसन्न अंतःकरणाने, उत्साहाने तयार राहण्याचा अभ्यास ठेवा. जे जे काही होईल, व्यक्त होईल ते भगवंताकडून आलेले असल्यामुळे मंगलमयच असणार अशी श्रद्धा बाळगा. अशा अभ्यासाने व श्रद्धेने काय होईल? निराशेचे, माघार घेण्याचे, नाखूष होण्याचे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये उद्भवणार नाहीत. ही साधना तुम्हास स्वानन्द-सागरात पोहण्याचे बळ देईल.