इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
क्षणक्षणा हाचि करावा विचार।
तरावया पार भवसिंधु।।१।।
नाशिवंत देह जाणार सकळ।
आयुष्य खातो काळ सावधान।।२।।
संतसमागमीं धरावी (धरूनि) आवडी।
करावी तांतडी परमार्थी।।३।।
तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें।
नये डोळे धुरें भरूनि राहों।।४।।
भावार्थ :-
भवसमुद्रामध्ये बुडालेल्या लोकांनी पलीकडे जाण्याचा विचार वारंवार करावा.
तो असा, की हा देह नाशिवंत (क्षणभंगुर) असून कधी तरी लयास जाणार आहे.
ह्याचे आयुष्य काळ खातो म्हणून सावध व्हावे.
संतसंग धरण्याची प्रीति धरून परमार्थ साध्य करून घेण्याची लगबग त्वरा करावी.
तुकाराम महाराज म्हणतात, ऐहिक प्रपंचव्यवहाराच्या मस्तीने अंध (अविचारी) होऊन राहू नये.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643187714530099201?s=20