इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडीझ डी किर्चनर या खुनी हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत. गोळ्यांनी भरलेली बंदूक घेऊन आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, पण बंदूक चालली नाही. राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडिस म्हणाले की, एका व्यक्तीने त्याच्या डोक्यावर बंदूक दाखवून ट्रिगर खेचला. सुदैवाने क्रिस्टीना अजूनही जिवंत आहेत, कारण काही कारणास्तव बंदुकीतून गोळी निघाली नाही. बंदुकीत एकूण पाच गोळ्या भरलेल्या होत्या. अर्जेंटिनामध्ये लोकशाही प्रस्थापित झाल्यापासूनची ही सर्वात गंभीर घटना आहे.
उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडिस यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खटला सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत त्यांचे समर्थक आणि विरोधक समोरासमोर उभे ठाकलेले दिसतात. उपराष्ट्रपतींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांच्या घराच्या बारवर शेकडो समर्थक जमा झाले होते. अर्जेंटिना आणि आसपासच्या प्रदेशात वाढत्या राजकीय तणावादरम्यान हा हल्ला झाला आहे.
या घटनेचे व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे. उपराष्ट्रपती समर्थकांना अभिवादन करत असताना एक माणूस त्यांच्या कपाळावर पिस्तुल दाखवत असल्याचे दिसून येते. हल्लेखोर ३५ वर्षीय मूळ ब्राझीलचा आहे. तपास अधिकाऱ्यांनी अद्याप त्याचे नाव जाहीर केलेले नाही. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी त्याला अटक केली आणि शस्त्र जप्त केले.
फर्नांडीज डी किर्चनर या अर्जेंटिनाचे राष्ट्रपतीही राहिल्या आहेत. २००७ ते २०१५ या कालावधीत त्यांनी दोन वेळा राष्ट्रापती म्हणून काम पाहिले. अर्जेंटिनामधील त्यांचा राजकीय दबदबा खूप मजबूत मानला जातो. सध्या त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्या आहेत. दोषी आढळल्यास फर्नांडिस यांना १२ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच सार्वजनिक निवडणुकीतून त्यांना संभाव्य अपात्रताही लागू होऊ शकते.
https://twitter.com/AZmilitary1/status/1565513406181941248?s=20&t=AkBQU0sJkE7AimHzkTaOIQ
Vice President Murder Attempt Video Viral