इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू नये. शेतकऱ्यांच्या मजबूत हातात राजकीय ताकद आणि आर्थिक क्षमता आहे.” असे उपराष्ट्रपती म्हणाले.
“कितीही आव्हाने, कितीही अडथळे आले तरी, भारताच्या विकासाच्या प्रवासात शेतकऱ्यांची भूमिका कोणीही कमी करू शकत नाही. आजची शासन व्यवस्था शेतकऱ्यांसमोर नतमस्तक आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
“शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ७३० हून अधिक कृषी विज्ञान केंद्रे कार्यरत आहेत, असे म्हणाले. शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करताना उपराष्ट्रपती म्हणाले , शेतकऱ्यांनी या केंद्रात जाऊन विचारावे की – ‘तुम्ही आम्हाला कोणत्या सेवा द्याल?’ शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी धोरणांबद्दल जाणून घ्यावे. म्हणजे शेतकऱ्यांना कळेल की सरकारने तुमच्यासाठी एक खजिना उघडला आहे, ज्याची तुम्हाला कदाचित माहिती नसेल. सहकारी संस्था काय करू शकतात हे देखील तुम्हाला माहिती नसेल.” असेही ते म्हणाले. उपराष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांच्या व्यापारात आणि मूल्यवर्धनात सहभागावर भर दिला.
उपराष्ट्रपती म्हणाले, “माझे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आणि मुलींना आवाहन आहे – कृषी उत्पादन हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात मौल्यवान व्यापार आहे. माझी नम्र विनंती आहे की – अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहकारी संस्थांचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी तरुणांना कृषी व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करताना केले. शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायांमध्ये सहभागी व्हावे आणि कृषी उत्पादन व्यवसायात परिश्रमपूर्वक काम करावे, असेही ते म्हणाले. यातून दीर्घकालीन सकारात्मक आर्थिक परिणाम मिळतील.” हे त्यांनी अधोरेखित केले.