नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ दि. १० ऑगस्ट रोजी संपत असल्याने आज या पदासाठी मतदान होत आहे. तसेच, आज सायंकाळीच त्याचा निकाल लागणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशातील हे दुसरे घटनात्मक पद असून या पदावरील मिळणारा पगार आणि भत्ते याची माहिती आपण घेणार आहोत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 68 नुसार, विद्यमान उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी, या पदावर नवीन व्यक्तीच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य आहे. यासंदर्भात, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक या बैठकीत निश्चित करण्यात आले. उपराष्ट्रपती भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ अॉगस्ट इ.स. २०१७ रोजी व्यंकय्या नायडू यांची १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
उपराष्ट्रपतीची निवड निर्वाचक सदस्यांद्वारे केली जाते. अर्थात दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य यासाठी मतदान करतात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यसभेचे 233 निवडून आलेले खासदार, राज्यसभेचे 12 नामनिर्देशित खासदार आणि लोकसभेचे 543 खासदार मतदान करू शकतात. यामध्ये एकूण 788 लोक मतदान करू शकतात. घटनेच्या अनुच्छेद 68 मध्ये असे नमूद केले आहे की, निवडणूक प्रक्रिया विद्यमान उपराष्ट्रपतींची मुदत संपण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्थात सध्या ही प्रक्रिया 10 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करावी लागेल.
निवडणुकीत उभे राहण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने किमान 20 संसद सदस्यांना प्रस्तावक म्हणून आणि किमान 20 संसद सदस्यांना समर्थक म्हणून नामनिर्देशित केले पाहिजे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार होण्यासाठी 15,000 रुपये सुरक्षा ठेव जमा करावी लागते. नामांकन केल्यानंतर, निवडणूक अधिकारी नामनिर्देशनपत्रांची छाननी करतात आणि पात्र उमेदवारांची नावे मतपत्रिकेत समाविष्ट केली जातात. रिटर्निंग ऑफिसरला लेखी नोटीस देऊन उमेदवारही अर्ज मागे घेऊ शकतो. उमेदवार जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो.
काही दिवसातच देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतील, तत्पुर्वी या पदाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भारतीय उपराष्ट्र पतींचा पगार किती असतो? त्यांना किती भत्ता मिळतो, सुविधा कोणत्या दिल्या जातात, याची सर्वांनाच उत्सुकता असते. राष्ट्रपती पदानंतर हे दुसरे घटनात्मक पद आहे. या पदाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिरक असावा. त्याचे वय किमान 35 वर्षे असावे. तसेच राज्यसभा निवडणूक लढवण्यास पात्र असावा. संसदेचं वरिष्ठ सभागृहाच्या रुपात उपराष्ट्रपतींना राज्यसभेचं नेतृत्वदेखील करावे लागते.
उपराष्ट्रपती पदाचा पगार संसद अधिकारी वेतन आणि भत्ता अधिनियम 1953 नुसार निश्चित केला जातो. उपराष्ट्रपती हे राज्यसभा अध्यक्ष असतात. त्यानुसार त्यांना वेतन आणि भत्ता मिळतो. त्यांना 4 लाख रुपये महिना वेतन मिळते. 2018 पर्यंत हे 1.25 लाख रुपये मासिक एवढे होते. त्यात सुधारणा झाल्यानंतर हा पगार 220 टक्के वाढवण्यात आला. राष्ट्रपती बाहेर असतात तेव्हा त्यांच्या जागी उपराष्ट्रपती कारभार पाहतात. या काळात त्यांना राष्ट्रपती पदाचा पगार आणि सुविधा मिळतात.
उपराष्ट्रपती पदाच्या सुविधांमध्ये सरकारी घर असून ते पूर्णपणे फर्निचरयुक्त असते. त्यात गरजेच्या आणि सजावटीच्या प्रत्येक वस्तू असतात. त्याला उपराष्ट्रपती भवनच म्हणतात. या बंगल्याचा पत्ता- बंगला नंबर 6, मौलाना आझाद रोज, नवी दिल्ली… असा आहे. सुमारे पावणे सात एकर परिसरात हा बंगला आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतातील उपराष्ट्रपतींना पेंशनच्या स्वरुपात 50 टक्के निवृत्ती वेतन मिळते. त्यासह अन्य वैद्यकीय सुविधादेखील आजीवन मिळतात.
Vice President Election Voting Result Today