नाशिक – विभागीय संदर्भ सेवा यांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन माजी मंत्री पंकजा पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते सोमवारी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ असणार आहे. माजी मंत्री जयकुमार रावल हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे १०५ खाटांचे नवीन रुग्णालय बांधण्यात येत आहे. या नवीन रुग्णालयात महाराष्ट्रात प्रथमच प्लास्टिक सर्जरी, पीडियाट्रिक इडेंतिक्स विभाग निरो सर्जन यासह नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग देखील तयार करण्यात येणार आहे. एकूण १३ कोटी ५० लाख रुपये या संपूर्ण रुग्णालयाच्या बांधकामासाठी होणार आहे.
या बांधकामा बाबत प्रतिक्रिया देताना आमदार देवयानी फरांदे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर या भूमिपूजनाच्या रुपाने मूर्तीमंत स्वरूपात येत आहे. नाशिक शहरातील गोरगरीब नागरिकांना प्लास्टिक सर्जरी सारखी सुविधा कोणत्याही सरकारी दवाखान्यात आजपर्यंत उपलब्ध नव्हती.गेली पाच वर्ष शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या मागणीची दखल घेऊन नाशिक शहरातील गोरगरीब जनतेला प्लास्टिक सर्जरी बरोबर निरो सर्जरी, नीरिप्लेसमेंट सुविधा उपलब्ध व्हावी , तसेच गोरगरीब जनतेच्या लहान मुलांना आयसीयु सुविधा देण्यासाठी विधान सभेत घोषणा करून नाशिककारांना हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या नवीन इमारतीत नवजात मुलांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रीमचुयर बाळासाठी चांगली सुविधा निर्माण होणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी २० कोटी तर वैद्यकीय साहित्यासाठी पंधरा कोटी असे एकूण ३५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज बांधकामाचा शुभारंभ होत होत आहे. राज्य शासनाचे वास्तुशास्त्रज्ञ अजय दाते यांनी ग्राऊंड + दोन मजले असणार्या अत्यंत सुरेख इमारतीचे डिझाईन तयार केलेले आहे. या इमारतीत सर्जरी साठी ऑपरेशन थेटर, नर्सिंग स्टेशन, स्टोअर रूम, मेडिकल स्टोअर, मेडिकल रेकॉर्ड रूम, स्टाफ चेंजिंग रूम, डाटा एंट्री ऑपरेटर यासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयासाठी आदर्श करावी अशा इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. मला विश्वास आहे बीपी सांगळे आणि कन्स्ट्रक्शन हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील नाशिककर जनतेच्या साठी ही सुविधा लवकरात लवकर सुरू होईल.