विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
टेलिकॉम कंपनी आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत असतात. सध्या सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये विविध प्लॅन आणण्याची जणू काही स्पर्धा सुरू आहे. त्यात आता वोडाफोन-आयडिया म्हणजे Vi ही कंपनी सध्या आघाडीवर दिसत आहे. वोडाफोन-आयडिया ( Vi) नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. वोडाफोन-आयडियाचे नवीन प्लॅन १ वर्षांच्या डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसह देण्यात येतात. व्होडा-आयडियाच्या या नवीन योजना ५०१ रुपयांपासून सुरू होऊन २,५९५ रुपयांपर्यंत आहेत.
मोबाईल ग्राहकांना या योजनांमध्ये डेटा वाटप, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते. नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च करण्याव्यतिरिक्त, वोडाफोन-आयडिया ने ४९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या त्याच्या सर्व पोस्टपेड प्लॅनमध्ये १ वर्षाचे डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन जोडले आहे. व्होडाफोन-आयडिया आपल्या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलला १ वर्षाची सबस्क्रिप्शन देत आहे. सदर योजना ५०१ रुपयांपासून सुरू होते. या प्लॅनमध्ये ग्राहकाला कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगसह दररोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. प्लॅनची वैधता २९ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो.
नवीन ७०१ रुपयांच्या योजनांमध्ये १ वर्षाच्या डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसह व्होडाफोन-आयडियाचा हा दुसरा प्लॅन आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. सदर प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. याशिवाय 32GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण २००GB डेटा उपलब्ध आहे. व्होडाफोन-आयडियाच्या ९०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी देखील उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज १००SMS पाठवण्याची सुविधा आहे. प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. याशिवाय प्लानमध्ये ४८ GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच, प्लॅनमध्ये एकूण ३०० जीबी डेटा उपलब्ध आहे.
वार्षिक वैधता योजनांमध्ये विशेष सुविधा आहे. व्होडाफोन-आयडियाच्या २,५९५ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलचे १ वर्षासाठी सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे. या प्लॅनची वैधता ३६५ दिवस आहे. सदर प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच, यामध्ये एकूण ५४७.५ GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. वोडाफोनच्या या चारही प्लॅनमध्ये बिंग ऑल नाईट उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. या योजनांमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त, वोडाफोन-आयडियाचा ६०१ रुपयांचा डेटा अॅड-ऑन पॅक डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलसाठी १वर्षाची सदस्यता देखील देते. या प्लॅनमध्ये ७५ GB डेटा देण्यात आला आहे.