मुंबई –: प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी ‘वोडाफोन-आयडिया’ ने आपल्या ग्राहकांसाठी खास फायदेशीर योजना आणली आहे. कंपनीने आपल्या ४४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बदल केला आहे. आता ४९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये मोफत सेवा दिली जाईल. हा प्लॅन आधीच डबल डेटा बेनिफिट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि मोफत नाईट डेटा सारख्या फीचर्ससह देण्यात येतो. आता ही योजना ग्राहकांसाठी अधिक उपयोगी आणि मूल्यवान बनली आहे.
वोडाफोन आयडियाचा हा ४९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. Vi चा हा प्रीपेड प्लॅन ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो. पूर्वी हा प्लान दररोज फक्त २ जीबी डेटासह येत असे. आता कंपनी डबल डेटा ऑफर अंतर्गत दररोज ४ जीबी डेटा देत आहे. अशा प्रकारे, ग्राहकांना एकूण २२४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील देण्यात आले आहेत.
सदर योजना वीकेंड डेटा रोलओव्हर वैशिष्ट्यासह देखील देण्यात येते. बिंज ऑल नाईट फीचर अंतर्गत, आपण दुपारी १२ ते सकाळी ६ पर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकता, तो डेटा पॅकपेक्षा वेगळा असेल. त्याचबरोबर, वीकएंड डेटा रोलओव्हर अंतर्गत, सोमवार ते शुक्रवार सदर डेटा वीकेंडला वापरला जाईल. तसेच कंपनीने आता या प्लॅनमध्ये एक नवीन फिचर जोडले आहे. ZEE5 प्रीमियमचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन आता योजनेत दिले जात आहे. या सबस्क्रिप्शनची किंमत ४९९ रुपये आहे.