नवी दिल्ली – कमीत कमी किंमतीत ग्राहकाला जास्तीत जास्त सुविधा देण्याची स्पर्धा मोबाइल कंपन्यांमध्ये सुरू असते. जिओ आणि एअरटेल या स्पर्धेत सध्या आघाडीवर असले तरी आता व्हीआय (व्होडाफोन आयडिया) ने देखील यात उडी घेतली आहे.
विशेष म्हणजे व्हीआयने या दोन्ही कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. आणला आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्या १४८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्याप्ती वाढवत काही बदल केले आहेत.
आतापर्यंत व्हीआयचा १४८ रुपयांचा हा प्लॅन देशातील काही ठरावीक सर्कल्समध्येच उपलब्ध होत. पण आता त्याची व्याप्ती वाढवून तो देशभरात लागू करण्यात आला आहे.
ओन्लीटेकच्या अहवालानुसार, व्हीआयने हा प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आणला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेत व्हीआयचा प्लॅन एक रुपयांनी कमी आहे. तर जिओपेक्षा याची व्हॅलिडिटी ४ दिवसांनी जास्त आहे.
काय आहे व्हीआयच्या १४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये?
व्हीआयच्या २८ दिवसांच्या प्रीपेड प्लॅनवर दिवसाला १ जीबी डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह व्हीआय मुव्ही आणि १०० एसएमएसची सुविधाही आहे.
तर जिओच्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला १ जीबी डेटा, मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळत असली तरी याची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.
एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २८ दिवस असून यातही मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. याशिवाय प्राईम व्हिडीओ मोबाइल एडिशन, विंक म्युझिक, फ्री हॅलो ट्यून आणि एअरटेल एक्सट्रीमची सुविधा आहे.