विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या योजनांबाबत मोठी स्पर्धा सुरू आहे. व्होडाफोन-आयडिया तसेच जिओ आणि एअरटेलने अनेक प्लॅन आणले आहेत, परंतु Vi चे काही प्लॅन हे Jio पेक्षा पुढे जात आहेत. व्होडाफोन आयडियाच्या एका प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात काही अतिरिक्त फायदे देखील आहेत.
व्हीआयचा ९०१ रुपयांचा प्लॅन :
वोडाफोन-आयडियाचा ९०१ रुपयांचा प्लॅन दररोज ३ जीबी डेटासह देण्यात येतो. याशिवाय ४८ जीबी अतिरिक्त डेटाही यात देण्यात येत आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. अशा प्रकारे एकूण डेटा ३०० जीबी होतो. अमर्यादित कॉलिंग सोबतच ग्राहकांना दररोज १०० SMS देखील दिले जात आहेत. एवढेच नाही तर व्होडाफोन-आयडियाच्या योजनेमध्ये डिस्ने प्लॅस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही, ही कंपनी १२ ते सकाळी ६ पर्यंत विनामूल्य डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि व्ही मूव्हीज आणि टीव्ही व्हीआयपीमध्ये प्रवेश देखील मिळतो.
विविध वैशिष्ट्यांसह Jio ची योजना : रिलायन्स जिओ अशा फिचर्ससह ९९९ रुपयांचा प्लॅन ऑफर करतो. जिओच्या या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे आणि यामध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. म्हणजे प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा दिला जातो. हा प्लॅन सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस ऑफर करतो. या व्यतिरिक्त, ग्राहकांना Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
दोन पैकी कोणत्या योजनेचा ग्राहकांना फायदा होतो? : रिलायन्स जिओच्या प्लॅनपेक्षा वोडाफोन-आयडियाचा प्लॅन स्वस्त असून काही गोष्टीत पुढे आहे. Jio प्लॅन सुमारे 100 रुपयांनी महाग आहे, नंतर Vi प्लान 48 GB अधिक डेटा, मोफत नाईट डेटा आणि वीकेंड रोलओव्हर डेटा सारख्या वैशिष्ट्यांसह देण्यात येतो. एवढेच नाही, व्होडाफोन-आयडियाच्या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सदस्यता देखील अतिरिक्त देण्यात येत आहे.