नाशिक – ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (वय ८७) यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. विनोदी साहित्यातील ते ज्येष्ठ लेखक होते. नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ असे असलेले दादा आज आपल्याला सोडून गेल्याने नाशिकच्या साहित्य परिवाराची मोठी झाली आहे, अशी भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. अतिशय सुस्वभावी व मनमिळावू तसेच आदरणीय व्यक्तिमत्व साहित्य क्षेत्रातून हरपल्याने साहित्य परिवारा वरील पितृछत्र हरपले आहे.
मराठी ग्रामीण विनोदी साहित्यातील ते मोठे व्यक्तीमत्व होते. लोणी प्रवरा या गावी त्यांचा जन्म झाला. भारत संचार निगम लिमिटेडमधून ते सेवानिवृत्त झाले होते. अनेकांना लिहिण्याची प्रेरणा देणारे साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. विनोदी दिवाळी अंकातून सातत्यपूर्ण लेखन केले. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
महामिने यांची पुस्तके अशी
आपल्याच बापाचा माल (विनोदी कथांचा संग्रह)
एक दिवसाचा मुख्यमंत्री (कथासंग्रह)
कोंडवाडा (कादंबरी)
गंगाराम गांगरेच्या गमती (बालसाहित्य, विनोदी)
गंगू आली रे अंगणी (कथासंग्रह)
खानावळ ते लिहिणावळ (आत्मचरित्र)
तिसरी पिढी (कादंवरी)
प्रवराकाठची माणसं (कथासंग्रह)
मदनबाधा-कादम्बरी
मराठीने केला बिहारी भ्रतार (कथासंग्रह)
साहित्य पालखीचे बेरके भोई (विनोदी लेख)
सिडको ते सिडनी (विनोदी)
हातचं सोडून पळत्यापाठी