ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री सुलोचना लाटकर (वय ९४) यांचे निधन झाले आहे. त्यांना दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यामुळे चित्रपट क्षेत्रातील एक पर्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे बोलले जात आहे. तसेच, सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
सुलोचना लाटकर या गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. सुलोचना यांच्या मृत्यूला त्यांच्या सुनेने दुजोरा दिला आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत त्यांच्या प्रभादेवी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मार्चमध्येही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी सुलोचनादीदींच्या उपचारासाठी मदत केली होती. दीदींच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीतून करण्याचे निर्देश दिले होते. सुलोचना लाटकर यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मराठा तितुका मेळावा’, ‘मोलकरीण’, ‘बाळा जो रे’, ‘सांगते ऐका’, ‘सासुरवास’, ‘वहिनी ची बांगड्या’ या त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच सुलोचना यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर या ९४ वर्षांच्या आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटांमध्ये ‘रेश्मा और शेरा’, ‘मजबूर’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही काम केले आहे. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये अनेकवेळा त्यांचा उल्लेख केला आहे. सुलोचना लाटकर यांनी सुमारे २० हिंदी आणि ५० मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीदी या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
Veteran Actress Sulochana Latkar Death