इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जपानमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपाने प्रचंड वाताहत केली आहे. ७.३ रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाने तेथे मालमत्तेची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे जपानमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच आता तर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. या भुकंपामुळे घरे, ऑफिंस आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नागरिकांची प्रचंड ताराबळ उडाली. अनेक दशकांनंतर एवढा शक्तीशाली भूकंप झाल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. त्यापैकी काही असे
मध्य जपानमध्ये एकापाठोपाठ आलेल्या दोन भूकंपांमुळे वीजेचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाले आहे.
https://twitter.com/BNONews/status/1504116642690830337?s=20&t=PZ8zhGqRHZvR2vqsn2SOlw
एका महिलेने मोठ्या धाडसाने तिच्या घरातील भूकंपाचा व्हिडिओ काढला
https://twitter.com/GBNfeed/status/1504113651732688899?s=20&t=PZ8zhGqRHZvR2vqsn2SOlw
टाइम मॅगझिनने या भूकंपाची तीव्रता दर्शविणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे
https://twitter.com/TIME/status/1504205451658936324?s=20&t=PZ8zhGqRHZvR2vqsn2SOlw
उत्तर जपानमधील फुकुशिमा येथे ७.३ आणि ६.४ रिश्टर स्केल क्षमतेचे दोन भूकंप झाले. त्यामुळे विमानतळासह अन्य ठिकाणी अशी भयावह परिस्थिती होती
https://twitter.com/Resist_05/status/1504431725577138176?s=20&t=PZ8zhGqRHZvR2vqsn2SOlw