बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अवघ्या ६ ते ७ तासांचा दिवस असलेल्या या गावाला गेला आहात का? नाशिकपासून आहे जवळच….

मे 19, 2022 | 10:00 pm
in इतर
0
IMG 20201221 WA0013

 

फोफसंडी

महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. येथे निसर्गरम्य सागरकिनारे, गड-किल्ले, पुरातन मंदिरे, जंगले-अभयारण्ये आदी तर आहेतच. पण अशी काही आश्चर्यकारक ठिकाणे आहेत की त्यांबाबत महाराष्ट्रातील जनताही अनभिज्ञ आहे. यातीलच एक सुंदर ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील फोफसंडी. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…..

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

म्हणून सूर्यप्रकाश कमी
फोफसंडी या ठिकाणाचे महत्व म्हणजे येथे महाराष्ट्रातील सर्वात कमी वेळ सूर्यप्रकाश मिळतो. म्हणजेच सर्वात उशिरा सूर्योदय आणि सर्वात आधी सूर्यास्त होणारे गाव म्हणजे फोफसंडी. येथे सूर्योदय हा महाराष्ट्रातील इतर ठिकाणांपेक्षा  दोन-अडीच तास उशिरा व सूर्यास्त दोन-अडीच तास लवकर होतो. म्हणजे दिवस हा फक्त सहा ते सात तासांचाच असतो. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दर्‍यात लपलेले हे फोफसंडी गाव अतिशय निसर्गरम्य आहे.

असे आहे निसर्गसौंदर्य
कुंजीरगडाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम छोटे खेडेगाव असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीत होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो. निसर्गात वसलेले असल्याने निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. त्यात सह्याद्रीच्या अगदी कुशीत त्यामुळे गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य यांचा सुरेख मिलाप येथे जुळून आलेला आहे.

रंजक इतिहास
फोफसंडी गावाला हे नाव मिळण्याचा इतिहास देखील खुपच रंजक आहे. पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर सुट्टीच्या दिवशी (रविवारी) विश्रांतीसाठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव फॉपसंडे पडले. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झाले. त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊसचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. मात्र अतिदुर्गम भाग असल्याने अनेक भौतिक सुविधांपासून हे गाव वंचित आहे. पण त्यामुळेच असेल कदाचित पण येथील गावपण टिकून आहे.

येथे कसे जाल
नाशिक पासून फोफसंडी फक्त ११० किमी अंतरावर आहे. अकोलेपासून ४० किमीवर आहे. स्वतःची गाडी घेऊन गेलेले अधिक चांगले. गावाला जोडणारी मर्यादित बस व्यवस्था आहे.

कुठे रहाल
हे गाव अगदी छोटे असल्याने राहण्याची सुविधा नाही. बेसिक सुविधा असलेले होम स्टे आहेत.
काय बघाल
फोफसंडी परिसरात सिझनल धबधबे, निसर्गरम्य पाॅईंटस, जवळच असलेले कळसुबाई शिखर. पावसाळ्यापूर्वी काजवे बघू शकता.
केव्हा जाल
वर्षभर केव्हाही जाता येते, पण पावसाळा अगदी योग्य

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खोटी बिले देऊन कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारास अटक; जीएसटी विभागाची कारवाई

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – २० मे २०२२

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर… बघा, कोणते प्रभाग झाले राखीव…

नोव्हेंबर 11, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय…

नोव्हेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - २० मे २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011