शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या जिल्ह्याला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

सप्टेंबर 1, 2022 | 4:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
rainfall alert e1681311076829

 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १ ते ३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून ३६,७३१ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ४,५१७ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २,२४० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८१४ क्युसेस, निळवंडे धरण १३०० क्यूसेस व ओझर बंधारा ९८३३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत ३८४.१ मि.मी. (८५.७ %) पर्जन्यमान झालेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे.

नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये.

अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४/२२५६९४० वर संपर्क साधावा. असे आवाहनही पल्लवी निर्मळ यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

https://twitter.com/RMC_Mumbai/status/1564529616504897541?s=20&t=XP3DMlE9K6bc2tNTrou35g

Very Heavy Rainfall Alert by IMD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लालबागच्या राजाचा प्रसाद आता पेटीएमवरून करा ऑर्डर; लाइव्ह दर्शनासह मंडळाला दान देण्याचीही सुविधा

Next Post

नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल कोश्यारी यांनी दिली भेट

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

crime112
क्राईम डायरी

बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या साडे तीन लाखाच्या आठ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत…

ऑक्टोबर 3, 2025
MOBILE
क्राईम डायरी

ऑनलाईन पैसे अदा केल्याचा फेक मॅसेज दाखवून पोबारा…दुकानादारांना घातला गंडा

ऑक्टोबर 3, 2025
G2P2FzVW4AAIZis 1920x1490 1
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला दिली भेट

ऑक्टोबर 3, 2025
G2QzQ01XEAAjeQw 1024x682 1
मुख्य बातमी

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

ऑक्टोबर 3, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी…

ऑक्टोबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी,जाणून घ्या, शुक्रवार, ३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 3, 2025
CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
Next Post
IMG 20220901 WA0026 e1662031399812

नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल कोश्यारी यांनी दिली भेट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011