नवी दिल्ली – भारत बायोटेक या कंपनीने बनविलेली भारतीय बनावटीची कोवॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांसाठी अतिशय आनंदाचे वृत्त आहे. कारण, ही लस घेतलेली असूनही अनेकांना परदेशात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अखेर कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निर्णयाची भारताला प्रतीक्षा होती. विविध कारणे आणि त्रुटी काढून डब्ल्यूएचओकडून चालढकलपणा केला जात होता. या निर्णयात मोठे राजकारण असल्याचाही आरोप करण्यात येत होता. कंपनीकडे विविध कागदपत्रांची आणि डेटाची मागणी वारंवार करण्यात आली. अखेर आता कोवॅक्सिन लसीला जगभर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ही लस घेतलेल्यांसाठी आणि घेणाऱ्यांसाठी आता परदेशात जाण्याचे किंवा तेथून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, या लसीची निर्यातही आता मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1455867809561411587