इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बेटी ही धनाची पेटी समजली जाते. कन्यारत्न झाले म्हणजे घरात लक्ष्मी आली असे मानले जाते. मुलगी लग्नाची झाली तर आई-वडिलांना काळजी तर वाटतेच, परंतु तिचे लग्न होऊन चांगल्या घरी जात असेल, तर समाधानही वाटते. तिच्या लग्नासाठी आई-वडील सर्व काही करण्यास तयार असतात. असेच एका पित्याने आपल्या लेकीच्या लग्नात चक्क वधू कन्येचे म्हणजे आपल्या मुलीचे दूध आणि पाय धुतले, इतकेच नव्हे तर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन देखील या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मिळणार प्रचंड व्हायरल असून त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून हा व्हिडीओ पाहून कोणीही सुद्धा भावूक होईल.
खरे म्हणजे बाप-लेकीचं नातं काही विशेष असंत. कारण कोणताही बाप लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो, त्यातच आई-वडिलांच्या आयुष्यात आनंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या मुलीचे लग्न होय, विशेषतः मुलीच्या लग्नात वडिलांचं गहिवरणं, भावुकपणे रडणं हा क्षण येतोच. लेकीच्या लग्नात गहिवरल्या बापाचा असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बापाने लेकीचे पाय दुधाने धुतले आणि ते प्यायले सुद्धा, याची चर्चा होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये लेकीच्या लग्नातल्या विधीपैकी एक विधी सुरू असल्याचं दिसून येतंय. यामध्ये लेक एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या पायाखाली एक ताट देखील ठेवण्यात आलंय. बाप आपल्या लेकीचे पाय प्रेमाने आधी पाण्याने धुताना दिसत आहेत. मग तिचे पाय दुधाने धुतात. लेकीचे पाय धुताना ताटात जे दुध जमा झालं ते एका वाटीत जमा करून ते दुध स्वतः पितात.
तसेच वडिलांना प्रेमाने आपले धुताना पाहून लेकीचे देखील अश्रू अनावर होतात. जे आपले वडील पाय धुतलेलं दुध पिऊ लागतात, त्यावेळी लेक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करते. पण बापाचं प्रेम इतकं होतं की त्यांनी तिचं सुद्धा ऐकलं नाही. त्यांनी तिला थांबवलं आणि दुध पिऊन टाकलं. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने तिचे पाय पुसतात आणि एका पांढऱ्या कपड्यावर तिच्या पाऊलखुणा घेतात, आठवण म्हणून.. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सारेच जण भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. असे प्रसंग समाजात आनंददायी असतात हे मात्र खरे .
भावुक पल..
विदाई से पूर्व बेटी के पद-चिन्हों को घर में संजोकर रखते मां-बाप..?#HeartTouching
VC : SM pic.twitter.com/kJdF8dj4e6— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) August 22, 2022
Very Emotional Moment Father Washed Daughter Leg With Milk Viral Video
Social Viral