नवी दिल्ली – जगात अनेक हुकूमशहा तथा लष्करप्रमुख होऊन गेले आहेत. त्यात हिटलरचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यानंतरच्या काळात देखील युरोप, आफ्रिका, आशिया खंडामध्ये अनेक राष्ट्रप्रमुख होऊन गेले. अशाच एका क्रूरकर्मा नेत्याची जगभरात चर्चा सुरू आहे. तो म्हणजे, बोस्नियाचा कसाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर्बियन भूतपूर्व जनरल आणि नेता रात्को म्लादिच. याची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय माध्यमात चर्चा होत आहे. ती का ते आपण आज जाणून घेणार आहोत.
जुलै १९९५ मध्ये जनरल म्लादिच याच्या आदेशावरून सर्ब सैन्याने तब्बल ८ हजाराहून अधिक बोस्नियाक मुस्लिमांचा निर्दयपणे नरसंहार केला. यात सर्व वयोगटातील पुरुषांचा समावेश होता. या हत्याकांडात लहान मुलांना देखील दया दाखविण्यात आली नाही. २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने म्लादिचला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र बोस्निया-हर्झगोव्हिनाचे अध्यक्ष मिलोराड डोडी यांनी या हत्याकांडाला नरसंहार मानण्यास नकार दिला.
विशेष म्हणजे, दुसर्या महायुद्धानंतरचे हे युरोपमधील सर्वात मोठे हत्याकांडाचे प्रकरण होते. संयुक्त राष्ट्रांनी आरोपांच्या अंतर्गत या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार म्हणून म्लादिचला जबाबदार धरले होते. याला कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र गुन्हे न्यायाधिकरणाचा निर्णय. ज्यामध्ये त्याची शिक्षा कमी करण्याचे आवाहन नाकारण्यात आले आहे. बेल्जियमचे वकील आणि गुन्हेगारी न्यायाधिकरणांसाठी आंतरराष्ट्रीय अवशिष्ट यंत्रणेचे मुख्य वकील सर्ज ब्रेमर्ट्स यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. आता या कसाईकडे पुढील अपील करण्याची संधी नाही. कोर्टाचा हा अंतिम निर्णय आहे.
आजही म्लादिच याचा उल्लेख होताच बोस्नियामधील लोकांचे चेहरे भीतीने पिवळसर झाले आहेत. तेथील आठ हजार लोकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा हाच तो मनुष्य आहे. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोवी आणि सर्बचे नेते राडोवन करादीजक यांच्यावरही या हत्याकांडासाठी प्रयत्न करण्यात आले. माजी युगोस्लाव्हियाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने मादिचला ४० वर्षांची शिक्षा ठोठावली, तर खटल्याच्या वेळी मिलोसेव्हिकचा मृत्यू झाला.
म्लादिच याने निशस्त्र लोकांवर गोळीबार केला. यावेळी हजारो लोकांची घरे जाळली गेली आणि ताब्यात घेतलेल्यांवर अत्याचाराचे व्हिडिओ बनवले गेले. हत्याकांडानंतर म्लादिच बराच काळ फरार होता. २०११ मध्ये त्याला अटक करण्यात आंतरराष्ट्रीय संघटना यशस्वी झाली. आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हे न्यायाधिकरणात त्याच्यावर खटला दाखल झाला होता.