चांदवड – तालुक्यतील उसवाड गावाला जोडणाऱ्या रस्त्याची सध्या प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. उसवाडच्या पूर्व बाजूने दरेगाव व मेसनखेडे शिंगवे दोन्ही व पुढे मनमाडला जाणारा हा रस्ता आहे. अवघ्या दोन किलोमीटरचा हा रस्ता ग्रामस्थ आणि वाहनधारकांची सध्या प्रचंड परीक्षा पाहत आहे. या रस्त्यावर खुप वर्दळ असते. याच रस्त्यावरुन अडीचशे पेक्षा अधिक मुले दररोज वाहतूक करतात. त्यांनाही खुप त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदारांसह प्रशासनाला विनंती करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नसल्याची तक्रार ह.भ.प. गणेश महाराज गायकवाड, पोपट शिंदे, बापू पवार, बाळासाहेब बिडगर, देवमन घुले, सोमनाथ म्हासुळ, देवाजी गायकवाड, श्याम पवार, सुनील बिडगर, यमाजी गायकवाड, विठ्ठल गायकवाड आदी ग्रामस्थांनी केली आहे. बघा रस्त्याचा हा व्हिडिओ