इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या कार मधून किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना त्या वाहनाची स्थिती व्यवस्थित तथा चांगली असणे आवश्यक असते. विशेषतः प्रवास लांबचा असो की, जवळचा कारचे टायर चांगले आहेत का ? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण टायर पंक्चर झाले तर प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्रवासात आपल्या कारचे टायर हे प्रवास करताना प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करणारा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जुने टायर वापरल्याने रस्त्यावर अधिक घर्षण निर्माण होते, परिणामी इंधनाचा वापर जास्त होतो. याशिवाय त्याचा स्फोट होऊन जीवित व वित्तहानीही होते. त्यामुळे ते वेळोवेळी तपासले पाहिजे.
कारमधून कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जाताना, लहान-मोठ्या समस्या दूर ठेवण्यासाठी काही आवश्यक गोष्टी जवळ असणे फायद्याचे ठरते. या वस्तूंमध्ये टूल किट, आपत्कालीन वैद्यकीय बॉक्स आणि टायर इन्फ्लेटर यांचा समावेश आहे. यातील टायर इन्फ्लेटर ही छोटी मशीन टायर पंक्चरसारख्या त्रासापासून वाचवते.
कोणतेही वाहन असो, कार-बाइक किंवा स्कूटर चालविणे सोपे असते, परंतु वाहन पंचर झाल्यावर मग मोठी अडचण निर्माण होते. त्यातच दुचाकीमध्ये स्टेपनी पर्याय उपलब्ध नसल्यास अशा परिस्थितीत जेव्हा टायर तो पंक्चर होतो, तेव्हा त्याला रागही येतो. पंक्चरचे दुकान जवळच दिसले तर ठीक, पण दूर असल्यास वाहने ढकलून न्यावी लागतात.
विशेषतः बाईकवरील लाँग ड्राईव्हवर पंक्चरचा ताण जास्त वाटत राहतो. कधी-कधी अनेक किलोमीटरवर पंक्चरचे दुकान नसलेल्या ठिकाणी टायर पंक्चर होतात. पंचर दुरुस्ती किटच्या मदतीने ही समस्या सोडवू शकता. हे किट सर्व कार तसेच बाइक आणि स्कूटरमध्ये काम करते. त्याची पिशवी अगदी लहान आहे. म्हणजेच ते तुमच्यासोबत सहजपणे घेऊन जाऊ शकता.
टायरमध्ये हवा भरणाऱ्या मशीनला टायर इन्फ्लेटर म्हणतात. याचा आकार खूप लहान असतो. वाहनातील जागा वाचवण्यासाठी तुम्ही पोर्टेबल टायर इन्फ्लेटरदेखील घेऊ शकता. तसेच कारमधूनच मिळते पॉवर, किंमत किती? प्रवासावेळी टायरमध्ये हवा कमी होणे, ट्यूबलेस टायरमध्ये पंक्चर इत्यादी बाबतीत ही मशीन खूपच उपयुक्त ठरते. अशा परिस्थितीत टायरमध्ये हवा भरून तुम्ही बराच लांबपर्यंत प्रवास करू शकता.
जवळच्या पंक्चरच्या दुकानापर्यंतही बिनदिक्कत जाऊ शकता. बाजारात अनेक टायर इन्फ्लेटर मिळतात जे कारच्या सिगारेट सॉकेटमध्ये कनेक्ट होतात. टायर इन्फ्लेटरसाठी १२ वॅट पॉवरची आवश्यकता असते, ती सिगारेट सॉकेटमधून पुरवली जाते. याच्यासोबत मोठी वायरही मिळते, त्यामुळे कारमधील सॉकेटला जोडून सहजपणे टायरमध्ये हवा भरता येते. हवा भरण्यासाठी तीन ते पाच मिनिटे लागतात. किंमत सुमारे १ हजार रुपयांपासून सुरू होते. काही इन्फ्लेटरना एलईडी बल्ब, डिस्प्लेचाही पर्याय मिळतो.
Vehicle Tire Puncture Air Filled within Few Minutes
Automobile