इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आवश्यक मानल्या जातात. त्यातच अन्न म्हणजे आहार कोणता घ्यावा या संदर्भात देखील वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यातच शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार या संदर्भात नेहमीच परस्परविरोधी मतं निर्माण होतात. परंतु आता मांसाहारापेक्षा शाकाहार हा अधिक उपयुक्त आणि चांगला आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
तीन नामांकित संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञांनी एका विस्तृत अभ्यासानंतर दावा केला आहे की, शाकाहारी लोकांमध्ये कर्करोगाचा धोका मांसाहार करणार्यांपेक्षा 14 टक्के कमी असतो. भूतकाळात, अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की शाकाहारी आहार हा रक्तदाब, लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह यासारख्या गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
बीएमसी मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित, वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ यांनी या अभ्यासात 4,72 हजार लोकांचा समावेश केला आहे. त्यांचा फूड डेटा यूके बायोबँककडून घेण्यात आला होता. जे नागरिक मांस आणि मासे खातात त्यांनाही वेगवेगळ्या वर्गात ठेवण्यात आले होते. 11.4 वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांच्या खाण्याच्या सवयी पाहण्यात आल्या.
पहिल्या गटात असे नागरिक होते, जे आठवड्यातून 5 किंवा त्यापेक्षा अधिक दिवस मांसाहार करतात. हे नागरिक रेड मीटपासून चिकनपर्यंत सर्व प्रकारचे मांस खात असत. दुसऱ्या गटात असे नागरिक होते जे आठवड्यातून पाच किंवा कमी दिवस मांस खातात. फक्त मासे खातात त्यांना तिसऱ्या गटात ठेवण्यात आले. चौथ्या आणि शेवटच्या श्रेणीत अशा शाकाहारी लोकांना ठेवण्यात आले होते, ज्यांनी कधीही मांस आणि मासे खाल्ले नाहीत.
डॉक्टर अयान बसू यांच्या मते, शाकाहारी आहारामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका 22 टक्क्यांनी कमी होतो. तसेच, यामुळे कोणताही कर्करोग होण्याचा एकूण धोका 10 ते 12 टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे शाकाहार आरोग्यासाठी चांगला मानला जातो.
शास्त्रज्ञांना आढळले की नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत अधूनमधून मांस खाणाऱ्यांना कर्करोगाचा धोका 2 टक्के कमी होतो. तसेच हा धोका फक्त मासे खाणाऱ्यांमध्ये 10 टक्के कमी असतो आणि शाकाहारींमध्ये 14 टक्के कमी असतो. कमी मांस खाणाऱ्यांमध्ये कोलन कॅन्सरचा धोकाही 9 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले.
शाकाहारी महिलांना रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 18 टक्के कमी असल्याचे आढळून आले. याचे कारण सामान्य वजन मानले जाऊ शकते. मांसाहार करणार्यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका मासे खाण्यात 20 टक्के आणि शाकाहारी लोकांमध्ये 31 टक्के कमी असल्याचे दिसून आले.