बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रात येणारा दीड लाख कोटींचा उद्योग गुजरातला पळवला; वेदांताची घोषणा

by Gautam Sancheti
सप्टेंबर 13, 2022 | 5:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Fchm9i3aQAA3oHZ e1663069464377

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील उद्योग जगतासाठी अत्यंत धक्कादायक वृत्त आहे. वेदांता उद्योग समुहाचा तब्बल १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये पळवून नेण्यात आला आहे. जून महिन्यापर्यंत तळेगावमध्ये गुंतवणुकीस इच्छूक असलेला हा उद्योग अचानक गुजरातला का गेला, असा घाणाघाती सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  त्यांनी आज माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

वेदांता लिमिटेड आणि तैवानची Foxconn पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये अर्धसंवाहक आणि प्रदर्शन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या करारांतर्गत १९.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील. संयुक्त उपक्रमाने पश्चिम राज्यातील सर्वात मोठे शहर अहमदाबादजवळ युनिट्स उभारण्यासाठी गुजरातमधून भांडवली खर्च आणि वीज यासह सबसिडी मिळविली. शोपीस गुंतवणूक, जी गुजरातने भारतीय राज्यातील कोणत्याही गटाद्वारे आतापर्यंतची सर्वात मोठी असल्याचे म्हटले आहे.

या कंपन्यांनी सांगितले की, वेदांत-फॉक्सकॉन संयुक्त प्रकल्पामुळे गुजरातमध्ये १ लाखाहून अधिक रोजगार निर्माण होतील. जगातील बहुतेक चिप्सचे उत्पादन तैवानसारख्या काही देशांपुरते मर्यादित आहे आणि उशीरा प्रवेश करणारा भारत आता कंपन्यांना “इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात नवीन युग सुरू करण्यासाठी” सक्रियपणे प्रलोभन देत आहे कारण ते चिप्सवर अखंड प्रवेश मिळवण्याचे मार्ग शोधत आहेत.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असल्याचे म्हटले. वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचे स्क्रिनशॉट शेअर करत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय याचा आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही अंतिम करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य यांनी केली.

https://twitter.com/ShivSena/status/1569633655114584064?s=20&t=TUHA0jRPRZ1ghsAgbIogIQ

आदित्य ठाकरे यांनी गुजरातमधील सेमीकंडक्टरच्या या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रकल्पामुळे भारताच्या विकासाचा नवा मार्ग सुरू होईल असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्राला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारे राज्य तयार करण्याचे प्रयत्न केले होते असेही आदित्य यांनी म्हटले. आता सेमीकंडक्टर तयार करणारा प्रकल्प वेदांता समूह-फॉक्सवेगन अहमदाबादजवळ सुरू होणार आहे. गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदाव, इतर मदत जाहीर केली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत १ हजार एकर जमीन ९९ वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती.

सध्या जगभरात सध्या सेमीकंडक्टरचा तुडवडा भासतोय. अशावेळी मोदी सरकारने भारताला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी PLI स्कीमही लागू करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समुह यासाठी फॉक्सकॉनसोबत मिळून काम करत आहे. सध्या सेमीकंडक्टरच्या समस्येने अख्खे जग चिंताग्रस्त झाले आहे. अनेक मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत.

केंद्र सरकारने संधी म्हणून पाहिलं आहे. सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ७६ हजार कोटी रुपयांच्या सेमीकॉन इंडिया प्रोग्रामला मान्यता दिली आहे. इंटिग्रेटेड डिस्प्ले अँड सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन इकोसिस्टीम महाराष्ट्रात उभारण्याविषयी वेदांता कंपनीने इच्छा व्यक्त केली होती. त्या संदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात बैठकही पार पडली होती. परंतु असे असताना महाराष्ट्र ऐवजी हा प्रकल्पाचा गुजरातला जात असल्याने केवळ शिवसेनेला आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला ही धक्का बसला आहे, असे म्हटले जाते.

Vedanta Group 1.54 Lakh Crore Investment in Gujrat

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टी-२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ दिसणार नव्या जर्सीत (व्हिडिओ)

Next Post

नाशिकच्या कन्येने सहनिर्मिती केलेला ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपट टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
Next Post
IMG 20220913 WA0033 1 e1663068880676

नाशिकच्या कन्येने सहनिर्मिती केलेला ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपट टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011