गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वेदांत फॅशन्स लिमिटेडचा IPO आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर…..

फेब्रुवारी 1, 2022 | 5:00 am
in राज्य
0
ipo

 

वेदांत फॅशन्स लिमिटेड आयपीओ काय आहे?

भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लागलेला आयपीओ धडाका तसाच पुढे सुरू आहे. गुंतवणूकदार आता वेदांत फॅशन्स लिमिटेडद्वारे येणाऱ्या सार्वजनिक प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत. मान्यवर, मोही, मंथन आणि त्वमेव यांसारख्या काही लोकप्रिय ब्रॅण्ड्समागील शक्ती म्हणून ही कंपनी ओळखली जाते. वेदांत फॅशन्सला बाजारात उतरण्यापूर्वी अत्यंत आवश्यक असलेली मान्यता या ब्रॅण्ड्सच्या एकंदर लोकप्रियतेमुळे प्राप्त झाली आहे आणि जोडीला दमदार वित्तीय कामगिरी नावावर असल्याने, आयपीओ गुंतवणूकदारांना मोठी मूल्यनिर्मिती करून देईल, असे अपेक्षित आहे. वेदांत फॅशन्स लिमिटेडचा आयपीओ काय आहे याबद्दल सविस्तर सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य.

कंपनी विषयी:
वेदांतने पुरुषांसाठीच्या एथ्निक ब्रॅण्ड्सवर लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रामुख्याने भारतातील उत्सवी पोशाखांच्या बाजारपेठेची मागणी कंपनी पूर्ण करते. हे खरेदीचे वन-स्टॉप डेस्टिनेशन असल्यासारखे आहे. वेदांत फॅशन्समध्ये ग्राहकांना सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी आवश्यक असलेले एथ्निक (पारंपरिक) कपडे मिळू शकतात. याशिवाय, वेदांत फॅशन्सची उत्पादने मल्टी-ब्रॅण्ड स्टोअर्स, बिग फॉरमॅट स्टोअर्स व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहेत.

आयपीओचे तपशील:
प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव ४ फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे आणि प्रारंभिक विक्री आरएचपीनुसार (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) ८ फेब्रुवारी रोजी समाप्त होईल. विक्री प्रस्तावामध्ये, प्रमोटर्स व वर्तमान समभागधारकाच्या ३,६३,६४,८३८ इक्विटी समभागांचा समावेश असेल. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य १ रुपया असेल आणि अपेक्षित दरश्रेणी प्रति इक्विटी समभाग ८२४ रुपये ते ८६६ रुपये असेल. एका लॉटमध्ये १७ समभाग आहेत आणि एक गुंतवणूकदार जास्तीतजास्त १३ लॉट्ससाठी अर्ज करू शकतो. जारीकरणानंतरचे (पोस्ट-इश्यू) बाजार भांडवलीकरण १९,९९८-२१,०१७ कोटी रुपयांच्या आसपास अपेक्षित आहे.

वर्तमान समभागधारणा:
ऱ्हाइन होल्डिंग्जकडे सध्या कंपनीच्या ७.२ टक्के भागाची मालकी आहे, तर ०.३ टक्के केदारा एआयएफकडे आहे. रवी मोदी फॅमिली ट्रस्टकडे कंपनीची ७४.६७ टक्के मालकी आहे. इश्यूचे बुक रनिंग लीड व्यवस्थापक अक्सिस कॅपिटल, एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे आहेत. प्री-इश्यू प्रमोटर होल्डिंग ९२.४० टक्के आहे.
आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विस्तार:
सप्टेंबर २०२१पासून फर्मच्या जागतिक रिटेल नेटवर्कमध्ये ५४६ एक्स्लुजिव ब्रॅण्ड आउटलेट्सचा (ईबीओ) समावेश आहे. यामध्ये ५८ शॉप-इन-शॉप्स तर अमेरिका, कॅनडा व संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय लोकसंख्या अधिक असलेल्या प्रदेशांतील ११ ईबीओंचा समावेश आहे. अशा रितीने उद्योगाचे एकंदर कार्यक्षेत्र विस्तृत आहे. ते केवळ भारतातच नव्हे, तर वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये पसरलेले आहे.

सारांश:
सर्वांत प्रसिद्ध मेन्स वेडिंग वेअर ब्रॅण्ड्सपैकी एक असलेला वेदांत लिमिटेड अन्य सूचित आयपीओंच्या स्पर्धेत उतरला आहे. कंपनीची दिशा सकारात्मक दिसत आहे. यांत भारताला आघाडीचे स्थान आहे आणि भारतीय ब्रॅण्डने शेअर बाजारात यशस्वीरित्या ठसा उमटवण्याची ही पहिली किंवा अखेरची वेळ नाही. यामुळे ब्रॅण्डला असलेल्या मान्यतेत वाढ होईल आणि त्याच्या इक्विटीला सार्वजनिक बाजारपेठ पुरवली जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘आयमा’च्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलचा दणदणीत विजय; ‘उद्योग विकास’चा धुव्वा

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या मंगळवारचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या मंगळवारचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011