मंगल वास्तू ऊर्जा
स्वतंत्र प्लॉटवर वास्तू बांधताना वास्तुशास्त्राप्रमाणे प्रथमपासूनच (FORMATIONAL STRUCTRE) मंगल वास्तू ऊर्जा करायला हवी. त्यासाठी वहन पद्धतीने रचना केल्यास वास्तूमधील एकंदरीतच संपूर्ण कुटुंबासाठी अनुभव आनंददायी होतो. याबाबत अनेक वाचकांनी प्रश्न पाठवल्यामुळे माझ्या अनुभवाच्या अनेक वास्तु रिझल्ट मध्ये वापरलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स स्वतंत्र प्लॉटवर बांधकाम करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी पुढील ४ आठवडे देत आहे…
वास्तूमध्ये उत्तर दिशेला 5, पूर्व दिशेला 4, दक्षिणेला 3 पश्चिमेला 2 OPENINGS ठेवाव्या. या openings वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रचनेप्रमाणे खिडक्या अथवा दाराच्या स्वरूपात असाव्यात..
उत्तर पूर्व ईशान्य कडून येणाऱ्या वायूवीजन व प्रकाश रचनेचा दाब हा दक्षिण-पश्चिम नैऋत्य कडील वायुवीजन व प्रकाशपेक्षा जवळपास दुप्पट असावा….
मुख्य प्रवेश दक्षिण पश्चिमेकडून असल्यास उत्तर पूर्वेकडे अधिक मोकळी जागा सोडावी….
वास्तुचे मुख्य प्रवेशद्वार हे चौकट असावे त्रिकट नसावे….. उंबरठा म्हणून ग्रॅनाईट अथवा मार्बल वापरू नये….
वास्तूमध्ये विरुद्ध रंगसंगतीचा त्याचप्रमाणे थेट गडद रंगांचा वापर करू नये….
छताला गडद रंग देऊ नये….
ब्रह्म तत्व (ब्रह्म बिंदू नव्हे) संपूर्ण मोकळे सोडावे त्यावर सदैव उजेड राहील असे पाहावे….
उत्तर पूर्वेकडच्या जिने व टॉयलेट टाळून दक्षिण-पश्चिम नैऋत्येकडे घ्यावे…
जिन्याची शेवटचीमुख्य वळणे उत्तर पूर्वेकडे घ्यावी….
पायऱ्या विषम संख्येत घ्याव्यात….
स्वयंपाक घर पूर्व आग्नेयेला तर देवघर पूर्व ईशान्य कोपऱ्यात द्यावे….
घरातील सर्व सदस्यांनी वाद तसेच वादाचे विषय टाळावेत….
वास्तुचे अंतर्गत तसेच बाहेरचा दक्षिण पश्चिम नैऋत्य कडील भाग हा उंच असावा तर उत्तर पूर्व ईशान्य कडे slope द्यावा…..
सुगंधी फुलांची पाच फुटापेक्षा जास्त न वाढणारी झाडे लावावीत….
उर्वरित टीप्स पुढील सप्ताहात दिल्या जातील…….
(वास्तू व्हिजिटसाठी फक्त व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी)