वास्तू शंका-समाधान
प्रश्न- श्री. अविनाश – वास्तूमध्ये रंगसंगती कशाप्रकारे घ्यावी?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूमध्ये रंगसंगती घेताना विरोधी रंग समोरासमोरील भिंतीला अथवा एकाच रूम मध्ये वापरू नये. फक्त दक्षिण अथवा पश्चिम नैऋत्य खिडकीस गडद रंगाचा पडदा वापरावा. उत्तर-पूर्व ईशान्य दिशा कडील चंद्र प्रवाहाची ऊर्जा वास्तूमध्ये मंडलाकार फिरण्यासाठी या भागात गडद रंग टाळावेत. फिक्या रंगांचे गुरु तत्व असते तर अति गडद रंग हे राहू तत्वाचे असतात. सूर्य प्रवाहाकडे दक्षिण पश्चिम नैऋत्य या भागात मुख्य प्रवेशद्वार येत असल्यास गडद रंग टाळावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना गडद भिंतीकडे पाठ करून बसावे.

व्हॉटसअॅप – 9373913484
पूर्व ईशान्येकडे हलका पिवळसर आग्नेय दिशेकडे हलका नारिंगी पश्चिम नैऋत्य कडे हलका गुलाबी वायव्येकडे पिस्ता कलर रचना वापरावी. छताच्या आकाश तत्वाला देखील अशीच हलकी रचना वापरावी. छताला गडद रंग अजिबात देऊ नये. वाहत्या पाण्याचे निसर्ग देखावे पक्षी फुले असे वॉलपीस उत्तर पूर्व ईशान्य कडे घ्यावे. तर हत्ती, पर्वतरांगा, उंच झाडे यांची चित्रे दक्षिण पश्चिम नैऋत्य कडे लावावीत. मुख्य प्रवेशद्वार तसेच कंपाऊंड गेट यास देखील गडद रंग देऊ नये. हलक्या रंगसंगतीमुळे वास्तुमधील शुभ उर्जा लहरी मंडलाकार प्रवाहित होऊन चैतन्य तसेच प्रसन्नता वाढते.